सर्दी-खोकला झालाय? हे आहेत घरगुती उपचार

-डाॅ. शंतनू जगदाळे

आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी त्याला न जुमानता लोकांना सातत्याने सर्दी-खोकल्याचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो अगदी चटकन पसरतो. त्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्‍टरांकडे गेलेच पाहिजे असे नाही, या दिवसात काही नैसर्गिक घरगुती डपचार करून
आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकतो.

पिण्याच्या पाण्यात बदल झाला आणि ऋतू बदलला की सर्दी, खोकला यांना हमखास सामोरे जावे लागते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच सर्दी-खोकल्याचा त्रास होत असतो. त्यासाठी प्रत्येक वेळी डॉक्‍टरांकडे गेलेच पाहिजे असे नाही, काही घरगुती रामबाण उपायही आहेत, त्यामध्ये प्राधान्याने पाणी उकळून थंड करून पिणे हा एक प्रथमोपचार म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

आधुनिक विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी त्याला न जुमानता लोकांना सातत्याने सर्दी-खोकल्याचा सामना करावा लागतो. सहसा हा आजार वातावरणातील बदलामुळे होतो. हिवाळ्यात तर तो आणखी लवकर पसरतो.

यावर काही नैसर्गिक पदार्थ वापरून आपण नियंत्रण मिळवू शकतो.

1.लिंबू अर्धे कापून त्यावर काळी मिरी पावडर व मीठ शिंपडून ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते. हा साधा आणि सोपा उपाय आहे.

2.चमचाभर शुद्ध मधात चिमुटभर पांढरी मिरी पावडर टाकून दिवसातून दोन वेळा घ्या. त्यामुळे खोकला कमी होतो आणि आरामही मिळतो.

3.नियमितपणे द्राक्षांचे सेवन केल्याने साधा सर्दी-खोकला लगेच बरा होतो. यामुळे फुप्फुसाचे कार्य सुधारते आणि कफ शरीराबाहेर पडतो.

4.काळी मिरी पावडर व सुंठ पावडर यांचे मिश्रण मधातून दिवसातून 2-3 वेळा घेतल्यास खोकल्यापासून त्वरित आराम मिळतो.

5.हिवाळ्यात दररोजच्या जेवणात लसणाच्या – पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्‍यता फार कमी असते. हा अगदी साधासोपा आणि कमी खर्चाचा तसेच योग्य उपाय आहे.

6.आवळा पावडर व मध यांचे मिश्रण तसेच, द्राक्षाचा रस आणि मध यांचे मिश्रण घेतल्यानंतर आराम मिळतो. हा सहज उपलब्ध होणारा आणि लहानांपासून मोठ्यांना चांगला उपयोग होणारा उपाय आहे.

7.पाव चमचा मिरी पावडर, पाव चमचा सुंठ पावडर आणि मध हे सगळे दोन चमचे पाण्यात मिसळावे. याने खोकला कमी होतो. तसेच खोकल्याची उबळ आल्यावर हे मिश्रण घेतल्यास लगेच आराम मिळतो.

8.पालकाच्या कोमट रसाने गुळण्या केल्यास कोरड्या खोकल्याचा त्रास कमी होतो. खसखस पेस्ट, नारळाचे दूध आणि चमचाभर मध हे मिश्रण रोज रात्री झोपताना घेतल्यास त्यानेही कोरडा खोकला कमी होतो.

9.पाण्यात भिजवलेली द्राक्षे तेवढ्याच साखरेत शिजवून त्याचा सॉस बनवून ठेवावा. झोपण्यापूर्वी हा सॉस घेतल्याने खोकल्याची ढास येत नाही. तुळस आणि बडिशेपेचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे.

10.कोरड्या खोकल्यावर बदाम हे रामबाण औषध आहे. पाण्यात भिजवलेले बदाम सोलून त्याची बारीक पेस्ट करून ती सकाळ-संध्याकाळ लोणी-साखरेत मिसळून घेतल्यास चांगला फायदा होतो.

11.खोकल्याबरोबरच श्‍वसनसंस्थेतील इतर बिघाड झाला, तर ते थोपवण्यासाठी दररोज चार तुळशीची पाने चार मिरीबरोबर चघळावीत. कांद्याचा रस व मध यांचे मिश्रण उत्कृष्ट कफसिरप आहे.

12.उकळत्या पाण्यात एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एका लिंबाचा रस आणि मध यांचे मिश्रणही असेच काम करते. यामुळे खोकल्यापासून तत्काळ आराम मिळतो.

13.सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यावे. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकून त्याचा वाफारा घ्यावा. हळकुंडाची पावडर करून ती रोज घ्यावी.

14.रात्री झोपताना 4-5 काळ्या मनुका नियमित घेतल्यास रात्री खोकल्याची उबळ कमी होते. त्याचबरोबर रात्री खोकल्याची ढास कमी करण्यासाठी बदामाच्या तेलाचे दोन थेंब गरम पाण्यातून घेतल्यास आराम वाटतो.

15.सकाळी हळद, मीठ गरम पाण्यात टाकून त्याच्या गुळण्या केल्या तर लाभदायक ठरतात. रात्री झोपताना हळद एक चमचा, चिमूटभर सुंठ पावडर गायीच्या दुधातून घेतल्यास सर्दी कमी होण्यास मदत होते.

16.सर्दीची लक्षणे जाणवल्यास प्राधान्याने अडुळशाची पाने, गवती चहा, दालचिनीचा एक तुकडा, मिरी, कडुलिंबाची पाने, सुंठ पावडर यांचा काढा करून घ्यावा.

17.सर्दीच्या सुरुवातीला कफ झाल्यास तळपाय व तळहात तसेच छातीला वेखंड पावडर चोळावी, त्यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. शांत झोप लागते आणि आरामही मिळतो. हा उपाय फायदेशीर ठरतो.

18.सर्दी होऊ नये, यासाठी घरात दररोज ओवा, कापूर, कडूलिंबाची पाने, वेखंड चूर्ण, बडीशेप, तुळशीची पाने इत्यादींचा धूर करावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी धूप लावावेत.

19.सर्दी झाल्यानंतर कपाळ व नाकावर, तसेच छातीवर हळद व सुंठ पावडर यांचा पाण्यातून लेप लावावा. इतरांना त्याचा त्रास होऊ नये, यासाठी शिंक आल्यास नाकाला रुमाला लावावा.

20.छाती, नाक, कपाळ ओव्याने शेकावे व ज्वारीच्या पिठाची धुरी घ्यावी. घशामध्ये खवखव लागल्यास लवंग, ओवा तोंडामध्ये चघळावे, त्यामुळे तोंडाला चव येते आणि आरामही मिळतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)