नारळ लागवडीचे तंत्र (भाग १ )

नारळ हे महत्वाचे पिक आहे. नारळाच्या सर्व भागाचा उपयोग होतो त्यामुळे नाराळास कल्पवृक्ष म्हणूा देखील संबोधले जाते. नारळा पासुन नारळ पाणी, खोबरे, तेल, कोकोपीट, पेंड, काथ्या इ. पदार्थ मिळतात तसेच करवंटी व खोडापासून विविध वस्तु तयार केल्या जातात. पानांचा उपयोग तात्पुरते शेड किंवा मंडप तयार करणेसाठी होतो.

* हवामान व जमीन – नारळास उष्ण व दमट हवामान मानवते. सरासरी 27 अंश. से. तापमान ,100 ते 300 से.मी. वार्षिक पास व बारामाही पाण्याची सोय असणा-या भागात नारळाची वाढ चांगली होते. समुद्रसपाटी पासुन सुमारे 900 मीटर उंचीपर्यत हे पीक येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन नारळ लागवडीस योग्य आहे.समुद्रकाठची रेताड जमीन, जांभ्या दगडापासून तयार झालेली जमीन नारळ वाढीस अनुकुल आहे.

* सुधारीत जाती –
* उंच जाती – या जातींची उंची 15 ते 18 मीटर व त्यांचे आयुष्यमान 80 ते 100 वर्ष असते. 5 ते 7 वर्षात फळधारणा होते. नारळाचा आकार मध्यम ते मोठा असतो.
* बाणावली – ही उंच वाढणारी जात असून ती सहा ते सात वर्षानी फुलो-यात येते. सरासरी प्रति झाड 80 ते 100 फळे मिळतात. झाडाचे आयुष्यमान 80 ते 100 वर्ष आहे.
* प्रताप – हीींउंच वाढणारी जात असून सहा ते सात वर्षानी फुलो-यात येते. नाराळाचा आकार मध्यम व गोलाकार आहे. सरासरी प्रति झाड 150 फळे मिळतात.
* बुटक्‍या जाती – या जातींची उंची कमी असते. 3 ते 5 वर्षात फळे येण्यास सुरूवात होते. झाडाचे आयुष्यमान 40 ते 50 वर्ष आहे. यामध्ये हिरवा, नारंगी आणि पिवळया रंगाची फळे आढळतात. घराशेजारी शोभेसाठी व शहाळयाचे पाणी पिण्यासाठी यांची लागवड करतात.

* चौघाट ऑरेंज डॉर्फ – ही बुटकी जात आहे. लागवड केल्यापासुन चार ते पाच वर्षात झाडे फुलो-यात येतात. ही जात शहाळयासाठी उत्तम आहे. शहाळयाचे पाणी गोड आहे. नारळ, फुलौरा, झावळीचा देठ यांचा रंग नारंगी असतो. सरासरी प्रति झाड 80 ते 125 फळे मिळतात.
* मलाया ग्रीन डॉर्फ – तिन ते चार वर्षात फुलोरा येण्यास सुरूवात होते. प्रति वर्षी सरासरी 90 ते 120 नारळे मिळतात. प्रत्येक नारळात सरासरी 160ग्रॅम खोबरे असते. नारळ, फुलौरा, झावळीचा देठ यांचा रंग हिरवा असतो.
* संकरीत जाती – टी स डी (केरासंकरा) – ही संकरीत जात आहे. झाडे चार ते पाच वर्षानी फुलो-यात येतात. एका झाडापासुन सरासरी 150 फळे मिळतात. खोब-यामध्ये तेलाचे प्रमाण 68% आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)