प्रथमेश परबच्या घरात “कोब्रा’ शिरला 

सिंधुदुर्ग: टाईमपास चित्रपटातील “दगडू’च्या भूमिकेने लोकप्रिय झालेल्या प्रथमेश परब याच्या मसुरे मागवणे येथील घरात कोब्रा शिरल्याची घटना घडली. कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या कोब्राला मसुरे कावावाडी येथील सर्पमित्र रमण चंद्रकांत पेडणेकर यांनर पकडले. त्या कोब्राने गिळालेली तीन अंडी रमणने कौशल्याने बाहेर काढून त्याला जंगलात सोडून देण्यात आले.
प्रथमेश परबच्या मसुरे मागवणे येथील घरात सुमारे पाच फूट लांबीचा विषारी कोब्रा नाग शिरला. तो थेट कोंबड्या असलेल्या खुराड्यात घुसला. ग्रामस्थांच्या निदर्शनास हा कोब्रा येताच सर्पमित्र रमण यांना पाचारण करण्यात आले. अवघ्या काही क्षणात रमण याने सदर विषारी नागाला पकडले. यावेळी नागाने कोंबडीची अंडी गिळल्याचे त्यांच्या लक्षात आले. नागाला अशा अवस्थेत जंगलात सोडणे हे त्याच्यासाठी धोक्‍याचे होते. म्हणून रमणने त्या नागास अत्यंत शिताफीने पकडून मोठ्या खुबीने त्याच्या पोटातील तीन अंडी बाहेर काढली आणि त्याला जंगलात सोडून दिले.
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)