कोस्टगार्डने 14 बांगलादेशी संशयितांना पकडले

प्रातिनिधिक छायाचित्र

दोन बोटीही जप्त; संशयितांना दिले वसई पोलिसांच्या ताब्यात

पालघर: पाणजू बेटानजीक समुद्रात बेकायदेशीररित्या घुसणाऱ्या 14 बांगलादेशी संशयितांना कोस्टगार्डने पकडले आहे. याशिवाय दोन बोटीही जप्त केल्या आहेत. ही कारवाई कोस्टगार्ड कॅप्टन विजय कुमार व त्यांच्या पथकाने केली. संशयितांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे सापडली नाहीत. तसेच त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशीय असल्याचे समजते. कोस्टगार्डने त्यांचा ताबा वसई पोलिसांकडे दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आबिल शेख (25), शफीकुल (27), आहाजित (33), मोईद्दीन (45), इस्लाम (35), बी. शेख (22), शैफुल (27), एन मुल्ला (45), रफीगुल (19), शहीफुल (27), जे मुल्ला (40), मोंडल (28), पायनल (38), इब्राहिम शेख (25) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

देशाला समुद्री मार्गाने येणाऱ्या संशयितांचा मोठा धोका आहे. डहाणू येथे कोस्टगार्डने उभारण्यात आलेल्या हावरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचालींना रोखण्याचे काम केले जात आहे. कोस्टगार्ड, पोलीस, कस्टम आदी विभागांतर्गत शनिवारी कॅप्टन एम विजयकुमार, कमांडर आर. श्रीवास्तव यांची टीम “सजग’ कोस्टल सिक्‍युरिटी एक्‍सरसाईज मोहिमेंतर्गत “एच 194′ हावरक्राफ्ट बोटीद्वारे समुद्रात तपासणी मोहीम राबवित होते.

त्यावेळी सकाळी 11.30 वाजता पाणजू बेटानजीक 6 बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले. कॅप्टन विजयकुमार यांनी आपल्या हावरक्राफ्टने त्या बोटीचा पाठलाग केला. पाठलाग करुन यातील 2 बोटी कोस्टगार्डने ताब्यात घेतल्या. मात्र, अन्य 4 बोटी खाडीच्या बाजूला असलेल्या किनाऱ्यावर लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात गायब झाले.

पकडलेल्या लोकांकडे बोटीची कागदपत्रे मागितली असता बोटीला कुठलाही नंबर, कलरकोड, बोटीची नोंद, ओळखपत्रे आदी कुठलीही कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे हे सर्व 14 लोक बांगलादेशी आणि बंगाली भाषेत बोलत असल्याचे निदर्शनास येताच संशय बळावल्याने कोस्टगार्डने त्यांना ताब्यात घेतले. या बोटींच्या मालकाचे नाव मायकल असे असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)