लोकसभेसाठी प्रादेशिक पक्षांसोबत युती : पी. चिदंबरम 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही नाकारले तरी सर्वांना माहीत आहे की, आरएसएस एक राजकीय संस्था आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर आरएसएसवर बंधने लादू. सरकारी कर्मचाऱ्यांना संघात प्रवेश करण्यापासून रोखू. असे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही म्हटले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपला रोखण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रत्येक राज्यातील प्रादेक्षिक पक्षांसोबत युती करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कॉंग्रेसच्या प्रचारासाठी चिदंबरम आज इंदूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी ते म्हणाले की, विविध राज्यांमध्ये कॉंग्रेसची युती होईल. त्यामुळे आम्हाला आगामी निवडणुका जिंकणे सोपे जाईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसने आता कंबर कसली आहे.विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या मदतीने कॉंग्रेस मैदानात उतरणार आहे. परंतु सध्या छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने कोणत्याही पक्षासोबत युती केलेली नाही. तेलंगणामध्ये कॉंग्रेसने प्रदेशिक पक्ष टीडीपीसोबत युती केलेली आहे. तसेच अनेक लहानमोठ्या पक्षांना एकत्र घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

चिदंबरम म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कितीही नाकारले तरी सर्वांना माहीत आहे की, आरएसएस एक राजकीय संस्था आहे. जर आम्ही सत्तेत आलो तर आरएसएसवर बंधने लादू. सरकारी कर्मचाऱ्यांना संघात प्रवेश करण्यापासून रोखू, असे त्यांनी सांगितले.
आरबीआयच्या पैशांवर मोदींचा डल्ला 
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी सरकारला पैशाची गरज आहे. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे मोदी सरकार आर्थिक पेचात सापडलेले आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया(आरबीआय)च्या पैशांवर त्यांना डल्ला मारायचा आहे, असा आरोप पी. चिदंबरम यांनी केला. सरकारची गेल्या साडेचार वर्षांत आरबीआयबाबत कोणतीही तक्रार नव्हती. परंतु आता सरकारला आरबीआयचा त्रास होत आहे. आरबीआयमुळे सरकारला मोकळया हाताने पैसा उधळता येत नाही. सध्या तरी सरकार पैसे मिळवण्यासाठी हापापलेले आहे. कारण त्यांच्या तिजोरीतील पैसा कमी झाला असून, वित्तीय तूट वाढत आहे. त्यामुळे सरकार आरबीआयला त्रास देऊन त्याचा पैसा मिळवू पाहते आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)