कोळसा घोटाळा प्रकरण: माजी केंद्रीय कोळसा सचिव एच.सी. गुप्ता यांना तीन वर्षे कारावास

नवी दिल्ली: पश्‍चिम बंगाल मधील कोळसा खाण वाटपात गैरव्यवहार केल्याच्या कारणावरून दिल्लीतील न्यायालयाने माजी केंद्रीय कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या समवेतच या विभागाचे अन्य दोन माजी अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. समिरा यांनाही प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

विशेष न्यायालयाचे न्यायाधिश भारत प्रसार यांनी या प्रकरणात विकास मेटल्स ऍन्ड पॉवर लि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विकास पटनी आणि त्यांचे सहकारी आनंद मलिक यांना प्रत्येकी चार वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या प्रकरणात संबंधीत कंपनीला एक लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आरोपींना 30 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने दोषी घोषित केले होते त्यांची शिक्षा आज सुनावण्यात आली.

-Ads-

त्यांच्या शिक्षेच्या संबंधात झालेल्या सुनावणीच्यावेळी त्यांना प्रत्येकी किमान सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सीबीआयच्यावतीने करण्यात आली होती. पश्‍चिम बंगाल मधील मोईरा आणि मधुजोरे येथील दोन कोळसा खाणी विकास मेटल्स अँड पॉवर कंपनी लि या कंपनीला देताना त्यांनी गैरमार्गाचा अवलंब केल्याचा आरोप होता. त्यांच्यावर सप्टेंबर 2012 मध्ये सीबीआयने आरोपपत्र ठेवले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)