‘बीसीसीआय’चा ‘आयपीएल’ बाबत महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली – पुलवामा येथे पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद संघटनेद्वारे घडवून आणण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा आयपीएलचं उद्घाटन हे थाटामाटात होणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

आयपीएलच्या उद्घाटनाचा खर्च टाळून ती रक्कम पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाला देण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1098881776141959170

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)