मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस लातूर हेलिकाॅप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार

संग्रहित छायाचित्र

मुंबई – लातूरमधील निलंग्यातील हेलिकाॅप्टर अपघातातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले होते. या लातूरमधील हेलिकाॅप्टर अपघाताला पायलट जबाबदार असल्याचं विमान दुर्घटना पथकाने आपल्या अंतिम अहवालात म्हटलं आहे.

लातूरमध्ये 25 मे 2017 रोजी निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकाॅप्टर कोसळलं होतं. त्यावेळी हेलिकाॅप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह आणखी 3 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होते. टेकआॅफच्या दरम्यान हायटेंशन वायरला धक्का लागल्याने हेलिकाॅप्टर कोसळलं होतं. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नव्हती, मात्र हेलिकाॅप्टरचं नुकसान झालं होतंं.

दरम्यान अतिरिक्त वजन असूनही पायलटने हेलिकाॅप्टर उड्डाणाचा प्रयत्न केल्याने अपघात झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलंं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त वजनासह हेलिकाॅप्टर उड्डाण करणे पायलटने टाळायला हवं होत, मात्र पायलटने हे नियम पाळले नाहीत. त्यामुळे लातूर हेलिकाॅप्टर दुर्घटनेला हेलिकाॅप्टरचा पायलट जबाबदार असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
1 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)