राज्याची तिजोरी शेतकऱ्यांसाठी खुली – मुख्यमंत्री

शेतकरी वारकरी महासंमेलन; शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत योजना चालू राहणार 

मुख्यमंत्र्यांनी टाळला विश्‍वस्तांचा विषय

तालुक्‍यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना आज मुख्यमंत्री शनी देवस्थान विश्‍वस्त निवडीवर भाष्य करणार का? यामुळे या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी 25 मिनिटे भाषणात शनीशिंगणापूरच्या विश्‍वस्त मंडळाच्या निवडीवर बोलणे टाळले. विशेष म्हणजे पालकमंत्री व आ. मुरकुटे यांनी आपल्या भाषणात मुद्दा काढला असतांनाही मुख्यमंत्री बोलले नाहीत. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्‍त केली.

नेवासे  – शेतकऱ्यांना पाठीशी गेल्या चार वर्षांपासून हे सरकार सैदव राहिले आहे. त्याच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले असून शेतकऱ्यांसाठी इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना आणली. ही योजना जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्‍त होत नाही, तोपर्यंत चालू राहणार असून राज्याची तिजोरी शेतकऱ्यांसाठी आम्ही खुली केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

शिंगणापूर येथील शेतकरी-वारकरी महासंमेलनाच्या उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलत होते. फडणवीस म्हणाले, श्री क्षेत्र शनिशिंगणापूर या पवित्र स्थानी शेतकरी-वारकरी एकत्र आले आहेत. शेतकरी हा वारकरी आहे आणि वारकरी हा शेतकरी आहे. खऱ्या अर्थाने वारकरी व शेतकऱ्यांनी धर्म आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.

महाराष्ट्राचा धर्म आणि संस्कृती वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवली आहे. चार वर्षाच्या काळात दुसऱ्यांदा दुष्काळला सामोरे जात आहोत. सध्या दुष्काळ समोर आहे. दुष्काळाचे नियोजन देखील चालू केले आहे. राज्यात 21 हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले आहेत.कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होणार नाही.हे आतापर्यंतच्या सरकार करू शकले नाही, असे ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, शनी महाराजाची वक्रदृष्टी पडल्यास उलटे होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील शनी देवाचे भक्त आहेत. सरकारमध्ये काम करताना शेतकऱ्यांसाठी बोंडअळीला 3 हजार रुपये कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. 2022 पर्यंत सर्वांना मोफत घरे बांधून देणार आहोत. शेतकरी-वारकरी यांच्यासाठी पाच लाख रुपयेची भरीव मदत आम्ही सुरु केली आहे.

बद्रीनाथ महाराज तनपुरे म्हणाले, शिंगणापूरचा शनी देव ठराविक लोकांच्याच मागे लागतो. आज हे वारकरी-शेतकरी महासंमेलनमध्ये महाराष्ट्र शासन व शेतकरी व वारकऱ्यांचा एकत्रित संगम म्हणजे त्रिवेणी संगम आहे. वारकऱ्यांनी शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे वागावे. शेतकऱ्यांच्या 10 एकरची दीड लाख रुपये किमत होते तर एका गाडीची किमत 10 लाख रुपये हा कसला नियम बॅंकेने लावला आहे. राज्यात पहिली आत्महत्या करणारा शेतकरीच आहे. शेतकरी वाचला तर देश वाचेल. असे महाराज म्हणाले.

आमदार मुरकुटे म्हणाले, नेवासा तालुक्‍यासाठी घाट माथ्यावरील पाणी वरदान ठरणार आहे. शनी देवस्थान राज्य सरकारने ताब्यात घेवून मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यामुळे येथील भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. यावेळी पालकमंत्री राम शिंदे यांचे भाषण झाले. प्रास्तविक मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, युवा मोर्चाचे अध्यक्ष सतीश कर्डिले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, भाजपचे नितीन दिनकर आदि मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)