निवडणूक कामकाजाच्या नावाखाली काम बंद

अधिकाऱ्यांची मनमानी ः शिधावाटप परिमंडळ कार्यालयातील कामकाज ठप्प

पिंपरी –
निवडणुकीच्या कामाच्या नावाखाली कोणतीही सरकारी कार्यालये बंद ठेऊ नयेत, असे आदेश असताना देखील निगडी येथील “अ’ व “ज’ शिधावाटप परिमंडळ कार्यालयातील काम बंद ठेवण्यात आले आहे, असा आरोप सामाजिक संघटनेने केले आहे. या कार्यालयातील अधिकारी निवडणूक कामकाजाच्या नावाखाली मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ह्युमन राईट्‌स असोसिएशन फॉर प्रोटेक्‍शनचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांनी केला आहे. कामकाज बंद करुन शिधा पत्रिकाधारकांची पिळवणूक करत असून त्यांची ही मनमानी त्वरीत थांबवण्यात यावी, अशी मागणी नवघन यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनामध्ये केली आहे.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील परिमंडळ अधिकारी इलेक्‍शन ड्युटीच्या व ऑनलाईनच्या नावाखाली नवीन दुबार नूतनीकरण व विभक्‍त शिधापत्रिकेचे कामकाज बंद ठेऊन मनमानी कारभार करत आहेत. शिधा पत्रिका धारकांना दोन ते तीन महिने अर्ज देऊन सुद्धा शिधापत्रिका मिळत नाहीत. कोणत्या दिवशी कार्यालय उघडायचे व कोणत्या दिवशी बंद ठेवायचे हे सुद्धा परिमंडळ अधिकारी ठरवतात. मंगळवारी (दि.26) निगडी येथील परिमंडळ कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते, असाही आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

निगडी येथील अ व ज परिमंडळ अधिकारी मनमानी करुन शिधापत्रिकेचे कामकाज बंद करतात. त्यांची ही मनमानी त्वरीत थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाष कोठारी, पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष अविनाश रानवडे, उपाध्यक्ष ओमकार शेरे, सचिव लक्ष्मण दवणे व डॉ. सतीश नगरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)