पुणे – खोमन सिंग भाटी, अर्णव सरीन, ऋता सामंत, इशांत उप्पल, प्रतिक्षा भट या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून येथे होत असलेल्या महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेटस् असोसिएशन (एमएसआरए) तर्फे आयोजित महाराष्ट्र क्लोज्ड् स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आपली आगेकूच कायम राखली आहे.
आयस्क्वॅश ऍकॅडमी, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूषांच्या गटात खोमनसिंग भाटी याने दुसऱ्या मानांकित वरूण जॉनी याचा 11-8, 11-6, 11-4 असा पराभव केला. तर, अभिनव सिन्हाने संकेत पाटीलचा 11-0, 11-1, 11-5 असा पराभव करत आपली आगेकूच कायम राखली. तर, अन्य सामन्यात साईराज मारावरने कार्तिकेय किशोरचा 11-4, 11-5, 11-2 असा सहज पराभव केला. तसेच सिमरनजीत सिंगने अमृत दासगुप्ताचा 11-4, 11-2, 11-7 असा पराभव करत आपली आगेकूच कायम राखली.
यावेळी झालेल्या19 वर्षांखालील गटातील सामन्यात आर्ष मेहता, अर्णव सरीन, अर्जुन सिंग, अव्देत नाईक यांनी आपली आगेकूच कायम राखली. तर, 17 वर्षाखालील गटात मोहीत भट, जेह पंडोले, रौनक सिंग, ऋता सामंत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा सहज पराभव केला. यावेळी झालेल्या 15 वर्षाखालील गटात पार्थ अंबानी, करण पटेल, शरण पंजाबी, युवराज वाधवानी यांनी देखील आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत आपली आगेकूच कायम राखली.