जोहान्सबर्ग: साऊथ आफ्रिकेमध्ये नुकतेच 64-antenna MeerKAT या अवकाश निरीक्षण करण्यासाठी उभारलेल्या दुर्बिणीचे अनावरण करण्यात आले आहे. शास्त्रज्ञांच्या मते ही दुर्बीण आतापर्यंतची सर्वाधिक आधुनिक दुर्बीण असून याद्वारे अनेक अवकाश गंगांचे सखोलपणे निरीक्षण करता येणार आहे.
या दुर्बिणीद्वारे आपली आकाशगंगा अर्थात ‘मिल्की-वे’चा फोटो घेण्यात आला असून शास्त्रज्ञांनी आकाशगंगेचा हा आतापर्यंत घेतलेला सर्वाधिक स्पष्ट फोटोग्राफ असल्याचे म्हंटले आहे. 64-antenna MeerKAT हा जगातील अनेक शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन उभारलेला प्रयोग आहे. एका दशकाच्या कठोर मेहनती नंतर हा प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. शास्त्रज्ञांना या प्रकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत.
64-antenna MeerKAT या दुर्बिणीद्वारे आकाशगंगेचे घेतलेले छायाचित्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)