पुलवामा स्फोटामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट पुरावे

केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड

नवी दिल्ली – पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग असल्याचे स्पष्ट पुरावे सुरक्षा दलांकडे आहेत. याची माहिती पाकिस्तानला देण्यात आली आहे, असे केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या व्यक्‍तींविरोधात जर भारताने गुप्तचरांकडील पुरावे दिल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते. त्या पार्श्‍वभुमीवर राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सुरक्षा आणि तपास संस्थांच्या हवाल्याने बोलताना पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे मिळाले आहेत. जरी पाकिस्तानला पुरावे दिले गेले असले तरी त्या देशाकडून अद्याप कोणतीही कारवाई केली गेलेली नाही. हे पुरावे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्‍तव्याला प्रत्युत्तर म्हणून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

आता सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक दिली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आता सुरक्षा दले नियोजनानुसार काम करतील, असेही राठोड यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षा दलेच योग्य ती कृती करतील. भारत हा एक जबाबदार देश आहे आणि देशाला, देशातील नागरिकांना सुरक्षित कसे ठेवायचे हे माहित आहे, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद बंद करत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नाही, हे सरकारने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)