पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने शहरात रविवारी (दि. 12) सकाळी 7 ते 10 या वेळेत स्वच्छता अभियान व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयनिहाय ही मोहीम राबविणार आहेत.
कचरा वाहतूक करण्यासाठी आवश्यक वाहने क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावीत. मोहिमेत जमा करण्यात येणारा कचरा वेळेत उचलून घेण्यात यावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत.