प्रभास आणि श्रद्धाचे हिंदी तेलगूसाठी एकमेकांना क्‍लास

श्रद्धा कपूर लवकरच ‘साहो’ चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार आहे. यात श्रद्धा आणि प्रभास स्क्रीन शेअर करणार आहे. दरम्यान या दोघांनीही चित्रीकरणादरम्यान तेलुगू आणि हिंदी शिकण्याची मदत केली. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ अशा तीन भाषांत प्रदर्शित होणार आहे. तेलुगू भाषा प्रभास अधिक चांगल्या पद्धतीने बोलतो तर श्रद्धा हिंदी. त्यामुळे या भाषांचे उच्चार अधिक चांगले करण्यास आणि भाषा सुधारण्यास दोघांनीही एकमेकांना मदत केली आहे.

“साहो’साठी प्रभासबरोबर काम करण्यासाठी अनेक हिरोईनना विचारण्यात आले होते. त्यामध्ये काही दक्षिणात्य तर हिंदी सिनेसृष्टीतील ऍक्‍ट्रेसनादेखील विचारणा झाली होती. मात्र मानधन आणि रोलमुळे बराच काळ कोणत्याही हिरोईनकडून होकार मिळत नव्हता. अखेरीस श्रद्धा कपूरने हा रोल स्वीकारला. चित्रीकरणादरम्यान श्रद्धा आणि प्रभासमधील जवळीकही वाढली असून, आता हे दोघेही चांगले मित्र आहेत. चित्रपटात या दोघांशिवाय एमी जैक्‍सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तवसारख्या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)