#धक्कादायक: ११वी च्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला

नवी दिल्ली: शाळेमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात ठेऊन आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यावर दुसऱ्या विद्यार्थ्यामार्फत चाकूने हल्ला करण्यात आला आहे. राजधानी दिल्ली मधील शाहदरा परिसरात असलेल्या एका शासकीय विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
इयत्ता ११वी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचे त्याच्याच शाळेमध्ये खालच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याशी भांडण झाले होते. याच गोष्टीचा राग मनात ठेवत आरोपी विद्यार्थ्याने ११वी मधील विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत त्याला जखमी केले. याबाबत पोलिसांनी आता अल्पवयीन विद्यार्थ्याला पकडले असून पीडित विद्यार्थ्याला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)