बेरोजगारांना दरमहा पाच हजार देणार
जयपुर: राजस्थानात येत्या 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. दरम्यान गेल्या जाहींरनाम्यातील 95 टक्के आश्वासने आम्ही पुर्ण केली आहेत असा दावा पक्षाने केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही गेल्या निवडणुकीत एकूण 665 आश्वासने दिली होती त्यातील 630 आश्वासने पुर्ण करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ही माहिती दिली.
आजच्या जाहीरनामा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अरूण जेटली, प्रकाश जावडेकर हे उपस्थित होते.
राजे म्हणाल्या की आम्ही नवीन जाहीरनाम्यात 50 लाख रोजगार निर्मीतीचे आश्वासन दिले आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात खासगी उद्योग उभारले जातील त्याद्वारे रोजगार दिला जाईल तसेच सरकारी क्षेत्रात दरवर्षी 30 हजार नोकऱ्या निर्माण केल्या जातील. 21 वर्षावरील युवकांना प्रतिमहिना पाच हजार रूपयांचा रोजगार भत्ता देण्याचे आश्वासनही पक्षाने जाहींरनाम्यात दिले आहे. राजस्थानातील बेकारीची समस्या पुढील पाच वर्षात आम्ही संपुष्टात आणू असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा