शहरातील अतिक्रमणे हटवली

पोवई नाका, बसस्थानक परिसरात आज कारवाई

सातारा – वहातुकीला अडथळा करणारी सातारा शहरातील राधिका रोड ते सातारा बसस्थानक या रस्त्यावरील व फुटपाथवरील अतिक्रमणे सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने हटवली. दरम्यान पोवई नाका ते सातारा बसस्थानक या रस्त्याच्या फुटपाथवरील टपरी धारकाची अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात शुक्रवार दि. 8 रोजी काढली जाणार असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले.

पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी 7 वाजता मोहीम सुरू केली होती. सातारा शहरातील राधिका रोड ते सातारा बसस्थानक या रस्त्यावर भरणाऱ्या बेकायदेशीर भामंडईवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा समर्थ भाजी मंडई, पोवई नाका संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता बांधकाम विभागाला दिला होता.

यावेळी राधिका रोड ते बसस्थानक रस्त्यावर बेकायदेशीर भाजी मंडई भरवली जात आहे. या प्रश्‍नी आम्ही वारंवार आपणास लेखी निवेदन दिली आहेत. आजपर्यंत कसलीही ठोस कारवाई झालेली नाही. हा रस्ता बांधकाम विभागात येत असल्याने फुटपाथवरील आणि रस्त्यावर वहातुकीला अडथळा करणारी लवकरात लवकर अतिक्रमणे काढावीत. तसेच वारंवार किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत आहेत. तरी या प्रश्‍नं आपण त्वरीत लक्ष घालून ठोस कारवाई करावी, अन्यथा आम्हांला लोकशीहीच्या मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिला होता. पालिका व बांधकाम विभागाच्या वतीने संयुक्तपणे पोलीस बंदोबस्तात शुक्रवार काढली जाणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)