शहर बससेवेसाठी राष्ट्रवादी विद्यार्थ्यांची निदर्शने

बससेवेच्या नियंत्रण कक्षाला घातला हार : सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर आरोप

नगर – शहराची बससेवा बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असताना तातडीने बससेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी माळीवाडा बसस्थानक चौकात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने आज निदर्शने केली. शहर बससेवेच्या नियंत्रण कक्षाला हार घालून आंदोलकांनी बससेवा सुरू करण्यासाठी लक्ष वेधले.

-Ads-

नगर शहर बससेवा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन ही बस सेवा सुरू करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. नवरात्र व दिवाळीसारखे सण येऊन ठेपले असताना उपनगरातून मोठ्या प्रमाणात नागरिक शहरात खरेदीसाठी येत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे खाजगी रिक्षाचालकांनी आपले दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागत आहे. शहर बससेवा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न बनला असून, ती त्वरीत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

बससेवा सुरु न झाल्यास आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी केला. शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, मयुर बांगरे, करण वाघमारे, अक्षय गायकवाड, ओंकार थोरात, अन्सार सय्यद, शहेजाद खान, लंकेश चितळकर, तुषार हंगे, अविनाश शिरसाठ, अखिलेश चव्हाण, नारायण आव्हाड, तुषार भोस, वैभव मांडे, शुभम गहिले, वैभव दळवी, प्रवीण थोरात, अंकुश चेलमेटी, अविनाश जोशी, प्रज्वल सोरटे, रितेश जोशी आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)