सिटीझन्सशिप विधेयक नागालॅंडने फेटाळले

कोहीमा : नागालॅंड मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारचे सिटीझन्सशिप विधेयक फेटाळून लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री नैफिऊ रिओ यांनी या संबंधात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की आमच्या राज्यातील सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि या विधेयकाच्या एकूण पार्श्‍वभूमीचा विचार केल्यानंतर आम्ही हे विधेयक फेटाळून लावण्याचा निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

लोकसभेत या महिन्याच्या सुरूवातीला हे विधेयक संमत झाल्यानंतर त्याचा ईशान्य भारतात जोरदार विरोध करण्यात आला तसेच नागालॅंड मध्येही त्याला प्रखर विरोध झाला होता. हे विधेयक राज्यात अंमलात आणले जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी या आधीच जाहीर केले होते. नागालॅंड मधील रहिवाशांचे मूळ हक्क अबाधित ठेवण्यासाठी आमचे सरकार पुर्ण कटीबद्ध राहील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)