पिंपरी – पोलीस आयुक्तालयाच्या शोजारीच असलेल्या सर गेलहॅड या सोसायटीत चोरट्यांनी साडे आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केला आहे. याप्रकरणी सिमा राम काळेल (वय-39) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही चोरी 1 ते 6 एप्रिलच्या दरम्यान घडली आहे. घराचा दरवाजा उघड़ा असताना त्याद्वारे प्रवेश करुन लाकडी कपाटीतील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बागंड्या असा सुमारे साडे आठ ताळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. ही घटना आयुक्तालयाच्या शेजारीच घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असूून पोलीस पुढील तपास करीत आहेत.