मितालीला वगळल्याचा पश्‍चाताप नाही : हरमनप्रीत कौर

अँटिग्वा – महिला विश्‍वचषक टी-20 क्रिकेटस्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. इंग्लंडच्या महिला संघाने भारताची घोडदौड रोखली. या सामन्यात अनुभवी मिताली राजला न खेळवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरच्या निर्णयावार टीका होऊ लागली.

मात्र, हरमनप्रीतने आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले की, मितालीला या सामन्यात न खेळवण्याचा निर्णयाचा मला कोणताही पश्‍चाताप नाही. सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, आम्ही जो काही निर्णय घेतला, तो संघाच्या भल्यासाठी घेतला. त्यामुळे काहीवेळा ते निर्णय यशस्वी होतात, तर काही वेळा फसतात.

-Ads-

त्यामुळे आजच्या निर्णयाचा पश्‍चाताप नाही. संपूर्ण स्पर्धेत आम्ही ज्या पद्धतीने खेळलो, त्यावरून प्रत्येक खेळाडूचा अभिमान वाटतो. आमचा संघ युवा खेळाडूंनी भरलेला आहे आणि आजचा पराभव आम्हाला शिकवण देणारा ठरला. काहीवेळा तुम्हाला खेळपट्टीनुसार स्वतःच्या खेळात बदल करावा लागतो. तसा बदल आम्ही आजच्या सामन्यात केला.

मिताली ही अनुभवी खेळाडू आहे. पण तिला संघाबाहेर ठेवणे हा संघासाठी घेतलेला निर्णय होता. त्यामुळे तिला वगळल्याचा अजिबात पश्‍चात्ताप नाही, असे मत तिने व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
57 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
90 :cry: Sad
115 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)