रमेश पोवार यांच्या नियुक्तीचा आम्हाला फायदा – हरमनप्रीत

अँटिग्वा  – भारतीय महिला संघ सध्या विश्‍वचषकात धडाकेबाज कामगिरी करताना उपान्त्यफेरीत धडक मारली असून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने भारताच्या या कामगिरीचे श्रेय संघाचे प्रशिक्षक रमेश पोवारयांना दिले असून पोवारयांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याचा फायदा संघाला झाला असल्याचेही तिने यावेळी नमूद केले आहे.

यावेळी पुढे बोलताना ती म्हणाली की, प्रशिक्षक रमेश पोवार यांच्या येण्यामुळे संघाला बराच फायदा झाला आहे. त्यांच्या येण्यानंतर आम्ही रणनितीमध्ये अनेक बदल केले असून त्याचा फायदा प्रत्यक्ष सामन्यात आण्इ संघाच्या कामगिरीत होतो आहे. या सर्व गोष्टींचे श्रेय प्रशिक्षक रमेश पोवार यांनाच जाते.

-Ads-

कारण, ते रुजु झाल्यानंतर आमच्या दृष्टीकोनात चांगला बदल झाला आहे. उपान्त्य सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलत असताना हरमनप्रीत कौरने रमेश पोवार यांचे कौतुक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)