स्मिथ आणि वॉर्नर वरील बंदी कायम राहणार : क्रिकेट ऑस्ट्रेलिया

ब्रिस्बेन – क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणी एक वर्षाची बंदी घातलेले खेळाडू माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावरील बंदी कायम राहणार असल्याचा निर्णय दिला आहे. या स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी खूप खालावली आहे. त्यामुळे त्याच्यावरील बंदी कमी करावी आणि त्यांना संघात पुन्हा स्थान देण्यात यावे अशी मागणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या माध्यमातून होत होती. त्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने हा निर्णय दिला आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने स्मिथ, वॉर्नर आणि 9 महिने बंदी घातलेल्या बॅंक्रॉफ्ट यांच्यावरील बंदी कमी करावी आणि संघात स्थान देण्यात यावे यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाकडे निवेदन दिले होते. त्यावर निर्णय जाहीर करताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाचे अंतरिम सचिव अर्ल इडडिन्ग यांनी सांगितले की, आम्ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनच्या सर्व मुद्यांचा बारकाईने विचार केला आहे. परंतु, अगोदर दिलेल्या निर्णयात बदल करणे योग्य नाही. तीनही खेळाडूंवर अगोदर ठरल्याप्रमाणे बंदी असेल.

-Ads-

ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाविरुद्ध मोठी मालिका खेळणार आहे. त्यात 4 कसोटी सामन्यांचा देखील समावेश आहे. ऑस्ट्रेलियन संघाची सध्याची कामगिरी पाहता भारत या मालिकेत निर्विवादपणे यशस्वी होईल असे मत जाणकार मांडत आहेत. स्मिथ आणि वॉर्नरयांच्या बंदीतील आठवा महिना चालू आहे तर बॅंकॉफ्ट हा डिसेंबर महिन्यापासून खेळू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)