#सिनेजगत : खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 3)

-सोनम परब
 
चित्रपटात नायकाइतकाच खलनायकही महत्त्वाचा. मग तो पुरुष असो वा स्त्री; परंतु नायकाच्या भूमिकेला उठाव देण्यासाठी खलनायकही तोडीस तोड असावा लागतो. अनेक हिंदी चित्रपट खलनायकांमुळे अधिक यशस्वी ठरले आहेत. खलनायकाचा लाउड आणि क्रूर असा पूर्वीचा चेहरा आता राहिलेला नसून, संयत व्यक्‍ती खलनायकाच्या भूमिकांमध्ये दाखविल्या जात आहेत. अशा प्रकारचा खलनायक साकारण्यासाठी ताकदीच्या अभिनेत्यांची गरज असते. त्यामुळेच चित्रपटांमध्ये करिअर करणाऱ्यांसाठी नायकाप्रमाणेच खलनायकाची भूमिकाही महत्त्वाची ठरत आहे.

मणिकर्णिका- द क्विन ऑफ झॉंसी या कंगना रणौतच्या ऐतिहासिक चित्रपटातून सोनू सूद बाहेर पडला नसता, तर तो सदाशिवराव यांच्या भूमिकेत दिसला असता. आता रांझणा चित्रपटात पंडित मुरारी ही भूमिका साकारणारा अभिनेता मोहंमद जीशान अयूब या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात रोहित शेट्टी यांच्या सिम्बा चित्रपटातील खलनायकी भूमिका सोनू सूदकडे आहे. हे पात्र “लार्जर दॅन लाइफ’ असल्याचे सांगितले जाते आणि अशा प्रकारच्या भूमिका करण्यात सोनू सूदचा हातखंडा आहे. दबंग चित्रपटात सलमान खानशी बरोबरीचा मुकाबला त्याने केला होता. त्यामुळेच सिम्बा चित्रपटात भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील रणवीरसिंह आणि माफियाच्या भूमिकेत असलेल्या सोनू सूदचा जबरदस्त मुकाबला पाहायला मिळेल.

दूरचित्रवाणीवर सतीपासून नागीनपर्यंत असंख्य भूमिका बजावणारी मौनी रॉय हिचा गोल्ड हा पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षयकुमारच्या पत्नीची भूमिका तिने साकारली होती. परंतु ब्रह्मास्त्र चित्रपटात मात्र तिची भूमिका खलनायकी असू शकते. रणवीर कपूर आणि अलिया भट्ट यांच्या या फॅण्टसी चित्रपटात नागीनसारख्याच चमत्कार करणाऱ्या स्त्रीची भूमिका मौनी साकारत आहे, असे सांगितले जाते. परंतु ही भूमिका खलनायकी स्वरूपाची असू शकते, अशी चर्चा आहे.

बाहुबली चित्रपटामुळे चर्चेत असलेला प्रभास याच्या आगामी साहो या चित्रपटात मंदिरा बेदी व्हॅम्प म्हणून पडद्यावर येणार आहे तर नील नितीन मुकेश हा खलनायकाच्या भूमिकेत असेल. मंदिरा बेदीला नायिका म्हणून बॉलीवूडमध्ये फारसे यश मिळू शकले नाही. नीलची कहाणीसुद्धा तिच्यासारखीच आहे. तोही नायकाच्या भूमिकेसाठी अनुपयुक्त मानला जातो. हे दोघेही प्रभासच्या चित्रपटात खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. या भूमिकांचा अधिक तपशील दिला गेला नसला, तरी दोघेही खलनायक आहेत, हे खरे. या चित्रपटानंतर व्हॅम्प म्हणून बॉलिवूडमध्ये हिट होण्याचा मार्ग मंदिरा बेदीसाठी खुला होईल, अशीही शक्‍यता आहे.

हिंदी चित्रपटांतील खलनायक आणि व्हॅम्प हे दोन्ही चेहरे बदलत चालले आहेत. अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांच्या काळात खलनायक अत्यंत “लाउड’ स्वरूपात पडद्यावर दिसत असे, तो आता संयत आणि “अंडरटोन’ दिसू लागला आहे. सिम्बा, 2.0 अशा चित्रपटांमधील खलनायक “लाउड’ असतीलही; परंतु सुपर 30, ब्रह्मास्त्र आणि साहो चित्रपटातील खलनायक संयत स्वरूपात दिसतील. अशा भूमिकांमध्ये यश मिळविण्यासाठी अभिनेता सशक्त असण्याची गरज असते. त्यामुळे, पंकज त्रिपाठी, नील नितीन मुकेश अशा चेहऱ्यांची गरज या भूमिकांसाठी अधिक असते.

खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 1)   खलनायकाचा बदलता चेहरा (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)