भारताची #AirStrike ची कारवाई पाकला झोबंली; बाॅलीवूड सिनेमाबाबत घेतला हा निर्णय

नवी दिल्ली – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करत जवळपास ३०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. त्यानंतर आता ही कारवाई पाकिस्तानला चांगलीच झोबंली आहे. भारताच्या #AirStrike चे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटू लागलेत.

पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या सिनेमा एक्झिबिटर असोसिएशनला भारतीय साम्रगीवर बहिष्कार घालण्यास सांगितला आहे. यामुळे कोणताही भारतीय सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही. याबरोबरच मंत्री फवाद यांनी पीईएमआरए ला भारतीय जाहिरातीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1100397853879488513

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)