चौंडीत अहल्यादेवी जयंती उत्सव

ना. शिंदे स्वागताध्यक्ष ः संभाजी राजे, ना. मुंडे, देशमुखांची उपस्थिती
जामखेड  –
पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर यांचा 294 वा जयंती महोत्सव शुक्रवारी (दि.31) चौंडी या त्यांच्या जन्मस्थळ आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या कार्यक्रमाला खासदार छत्रपती संभाजी राजे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांची प्रमुख उपस्थिती असेल. महोत्सवाचे स्वागताध्यक्षपद पालकमंत्री प्रा. राम शिंदे भूषवणार आहेत.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता अहल्यादेवी होळकर यांचा जन्मोत्सव चौंडी येथे साजरा होत आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नुकतीच पुणे येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. 31 मे रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, खा. डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, नवनिर्वाचित खा. डॉ. सुजय विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. अरुण जगताप, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. स्नेहलता कोल्हे, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. राहुल जगताप, आ. संग्राम जगताप, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. वैभव पिचड, आ. रामहरी रुपनवर, आ. राम वडकुते, आ. नारायण पाटील, आ. दत्तात्रय भरणे, आ. अनिल गोटे, माजी आमदार ना. धो. महानोर, प्रकाश शेंडगे, हरिदास भदे, रमेश शेंडगे, पोपटराव गावडे, नानाभाऊ कोकरे, विजय मोरे, अनंत कुमार पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे.  जयंती महोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)