चुलबुल इज बॅक; ‘दबंग ३’चे पोस्टर प्रदर्शित  

‘दबंग’ आणि ‘दबंग २’ हे दोन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट झाल्यानंतर सलमान ‘दबंग’च्या फ्रेन्जायझीमधील तिसरा भाग घेऊन येत आहे. ‘दबंग ३’चे पोस्टर रिलीज झाले असून सोबतच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. सलमान खानने हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.

या पोस्टरमध्ये सलमान पोलिसांच्या युनिफॉर्म दिसत आहे. या युनिफॉर्मवर सलमानच्या पात्राचे नाव चुलबुल पांडे असे लिहिले आहे. सलमानने पोस्टर शेअर करताना म्हटले, चुलबुल इज बॅक – दबंग ३. यासोबतच २० डिसेंबर २०१९ रोजी दबंग ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दबंग ३चे पहिले शूटिंग पूर्ण झाले आहे. सिनेमाची शूटिंग मध्य प्रदेशच्या महेश्वर येथे झाली होती. शूटिंग सेटवरून सतत सलमानचे नवे फोटोज समोर येत आहेत. आतापर्यंत सलमानचा चुलबुल पांडेचा अधिकृत लूक समोर आलेला नाही. सोनाक्षी सिन्हाने या चित्रपटातील रज्जोचा लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. सिनेमाचे दिग्दर्शन प्रभु देवा करत आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपटही २० डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामुळे दबंग ३ आणि ब्रम्हास्त्र या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.

https://www.instagram.com/p/Bulx9mxHZeV/?utm_source=ig_web_copy_link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)