#Christmas 2018 : ख्रिसमस शॉपिंगसाठी हे आहेत प्रसिद्ध ठिकाण

कुठलाही सण असो सणांची सुरुवात बाजारपेठांमध्ये झालेल्या गर्दीवरून दिसून येते, आपल्या देशात प्रत्येक सण उत्सवावेळी बाजारपेठ सर्वप्रथम सज्ज होतात. यातच डिसेंबर म्हंटला की ख्रिसमस आणि न्यूव इयरमुळे वर्षाच्या शेवटी आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. ख्रिसमस आणि न्यू इयरमुळे हल्ली अनेक लोक ख्रिसमस शॉपिंगसाठी देशातील दिल्ली, मुंबई, गोवा, शिलॉन्ग, पुडुचेरी, कोच्चि तसेच बेंगलुरु या शहरातील मार्केटला प्राध्यान देतांना दिसतात. यामुळे भारतातील या शहरांमधील मार्केटला पर्यटक सुध्दा आवर्जून भेट देतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर्मन ख्रिसमस मार्केट, दिल्ली आणि मुंबई

जर्मन ख्रिसमस मार्केट इंडो-जर्मन चैंबर ऑफ कॉमर्स यांद्वारे दिल्ली और मुंबई येथे डिसेंबरमध्ये मार्केट लावल्या जाते. ट्री डेकोरेशन, लाइट्स आणि सजावट यांसारखे इतर आकर्षक वस्तू मार्केटमध्ये उपलब्ध असतात. स्ट्रीट शॉपिंगसाठी भारततील सर्वात चांगले मार्केट म्हणून यांकडे बघितल्या जाते.

गोवा, शिलॉन्ग आणि पुडुचेरी

ख्रिसमस या उत्सवासाठी भारतातील गोवा, शिलॉन्ग आणि पुडुचेरी हे ठिकाण सर्वात जास्त फेमस आहे. याचे श्रेय इथे असलेल्या आकर्षित मार्केट्सला जाते. गोवामध्ये शॉपिंगसाठी अन्जुना फ्ली मार्केट फेमस आहे. तर शिलॉन्गमध्ये पुलिस बाजार, बर्रा बाजार आणि जीएस रोड इथे ख्रिसमस दरम्यान आगळा वेगळा माहौल बघावयास मिळतो.


कोच्चि

भारतातील साउथ इंडियामध्ये कोच्चि कार्निवल हे ठिकाण ख्रिसमससाठी प्रसिद्ध आहे. इथे ख्रिसमस दरम्यान प्रसिद्ध संगीतकारांचे म्यूजिक तसेच डांस परफॉर्मेंस होतात. त्याच प्रमाणे येथील मार्केटमध्ये सजावटसाठी युनिक वस्तू मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)