ख्रिस्तियान मायकेलला 5 दिवसांची कोठडी

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर करार घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तियान मायकेलला बुधवारी पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. मंगळवारी रात्री त्याला दुबईहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते.

या प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधिश अरविंद कुमार यांच्यासमोर सुनावणी झाली. सीबीआयकडून विशेष सरकारी वकील डी. पी. सिंह, तर आरोपीच्या वतीने वकील एल्जो जोसेफ यांनी काम पाहिले. मायकेलने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

-Ads-

सीबीआयने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्याच्याकडून अनेक महत्वपूर्ण कागदपत्रांबाबत माहिती घ्यायची आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून आम्हाला याप्रकरणी मायकेलची कोठडी हवी आहे. कारण दुबईच्या दोन खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित झाले होते. त्यामुळे त्याची सीबीआय कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
सीबीआय कोठडीला आरोपीच्या वकिलांनी विरोध दर्शविला. ते म्हणाले, या प्रकरणी सीबीआयने ठोस पुरावे सादर करावेत. तसेच लाच म्हणून स्विकारलेल्या पैशांचा शोध घ्यावा, असा युक्‍तीवाद केला. दोन्ही बाजूचा युक्‍तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत जामीन अर्ज फेटाळत पाच दिवसांची सीबीआय कोठडीचे आदेश दिले.

दरम्यान, याप्रकरणी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्‍यता आहे. चौकशीत मायकेलकडून अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर येऊ शकतात. ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणात मायकेलला लाच म्हणून 225 कोटी रुपये मिळाले होते, असा आरोप आहे. 12 हेलिकॉप्टरचा करार आपल्या बाजूने व्हावा यासाठी केलेल्या व्यवहाराच्या नावावर ही लाच देण्यात आली होती, असे ईडीने म्हटले होते. मायकेलने दुबईतील आपली कंपनी ग्लोबल सर्व्हिसेसच्या माध्यमातून ही रक्कम घेतली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)