ख्रिश्‍चन मिशेल याला सात दिवसांची ईडीची कस्टडी

नवी दिल्ली: ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेला मध्यस्थ ख्रिश्‍चन मिशेल याला आज सात दिवसांच्या ईडीच्या कस्टडीत पाठवण्यात आले आहे. विशेष न्यायाधिश अरविंद कुमार यांनी आज मिशेल याचा जामीन अर्ज केवळ दाखल करून घेत त्याला ईडीच्या कोठडीत पाठवले. सीबीआयच्या ताब्यातून आज ईडीने त्याला अटक केली. त्याला आज कोर्टापुढे हजर करण्यात आले असता ईडीने त्याच्या पंधरा दिवसांच्या कस्टडीची मागणी केली.

पण कोर्टाने त्याला सात दिवसांची कोठडी मंजुर केली. मिशेलने केलेल्या जामीन अर्जावर कोर्टाने कोणताच निकाल दिला नाही त्यावर कोर्ट 28 डिसेंबर नंतर निर्णय देईल. त्याच्या ईडी कोठडीची मुदत तो पर्यंत संपत आहे. मिशेल हा ब्रिटनचा नागरीक असून त्याला सौदी सरकारने भारताच्या ताब्यात दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)