विश्वचषकानंतर होणार क्रिस गेल निवृत्त

नवी दिल्ली: वेस्ट इंडिजचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज ख्रिस गेल आगामी विश्वचषकानंतर क्रिकेटच्या एकदिवसीय प्रकारातून निवृत्ती घेणार आहे. याबाबतची घोषणा वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाच्या अधिकृत ट्‌विटर अकाऊंटवरून करण्यात आली आहे.

इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी ख्रिस गेलची निवड झाली असूनबऱ्याच कालावधी नंतर ख्रिस गेलचे वेस्ट इंडिजच्या एकदिवसीय संघात पुनरागमन झाले आहे. गतवर्षी भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी गेलची संघात वर्णी लागली होती. परंतु, त्यानंतर त्याने माघार घेतली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)