ख्रिस गेलचा टी-20 मध्ये नवा विक्रम

दहा विविध लीगमध्ये खेळणारा एकमेव खेळाडू

मुंबई : वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर टी-20 क्रिकेटमधील अनेक विक्रम आहेत. त्यातच त्याने एक नवा आणि अनोखा विक्रम आपल्या नवावर केला आहे.

गेल मॅझन्सी सुपर लीगमध्ये जोझी स्टार संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यासह दहा विविध व्यावसायिक लीगमध्ये खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

गेल सध्या अफगाणिस्तान प्रीमिअर लीग, मॅझन्सी सुपर लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग, इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग, बिग बॅश लीग, रॅम स्लॅम टी20, व्हिटालिटी ब्लास्ट, बांगलादेश प्रीमिअर लीग आणि ग्लोबल टी20 कॅनडा या लीगमध्ये खेळतो आहे. त्यामुळे सध्या वेगवेगळ्या 10 टी-20 लीग्ज मध्ये खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
55 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
3 :heart_eyes:
5 :blush:
0 :cry:
4 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)