#IPL2019 : ख्रिस गेलच्या चार हजार धावा पूर्ण

जयपूर -किंग्ज इलेव्हन पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने आयपीएलमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. गेलने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगात 4 हजार धावांचा टप्पा गाठला आहे. 4 हजार धावा पूर्ण करणारा गेल दुसरा परदेशी खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये सर्वांत वेगवान 4 हजार धावा करण्याचा मान गेलने पटकावला आहे. त्याने डेव्हिड वॉर्नरचा 114 डावांचा विक्रम मोडीत काढला आहे. गेलने 112 डावांत 4 हजार धावांचा टप्पा गाठलाय. भारताच्या विराट कोहलीने आयपीएलमध्ये 128 डावांमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील राजस्थान रॉयल्सविरोधातील चौथ्या सामन्यात गेलने 4 हजार धावांचा टप्पा गाठला. आयपीएलमध्ये 4 हजार धावा पूर्ण करणारा गेल हा 9वा फलंदाज आहे. तसेच गेलच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावल्याचा विक्रम आहे. त्याने292 षटकार मारले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)