पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही झाले चौकीदार

नवी दिल्ली – ‘चौकीदार चोर है’, या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपंन ‘मै भी चौकीदार’ म्हणत एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच ट्विटरवरील आपल्या नावात देखील भाजप नेत्यांनी बदल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील नावात बदल केला आहे. मोदी यांनी ट्विटर अकाऊंटचं नाव चौकीदार नरेंद्र मोदी असं ठेवलं आहे. तर अमित शहांनीही ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार असं लिहिलं आहे.

नरेंद्र मोदीं यांनी चौकीदार हा ट्रेण्डं सुरू केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी तो फाॅलो केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या अनेक राज्य तसेच केंद्रीय मंत्र्यांनी देखील आपल्या नावापुढे चौकीदार असं लिहित ट्विटरवरील नावात बदल केला आहे.

मोदींची आता मै भी चौकीदार मोहीम

https://twitter.com/narendramodi/status/1106759555315314689

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)