‘चौकीदार चोर है; आमच्या कंपनीचे डिझाईन चोरले’

हैद्राबाद – भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅक झाल्यानंतर पुन्हा नव्याने सुरु करण्यात आली. मात्र या नव्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप एका स्टार्टअप कंपनीने केला आहे. आंध्रप्रदेशमधील डब्यू थ्री लेआऊट्स या कंपनीने हा आरोप केला आहे. भाजपने कोणतेही क्रेडिट न देता आमच्या टेम्प्लेट चोरल्या तसेच चोरी उघड होऊ नये म्हणून बॅक लिंकही काढून टाकली, असा आरोप कंपनीने एका ब्लॉगच्या माध्यमातून केला आहे.

काय आहे डब्यू थ्री लेआऊट्सचा ब्लॉग 
आम्ही आंध्रप्रदेशमधील नेर्रोल येथील एक लहान स्टार्टअप कंपनी आहोत. आम्ही प्रिमियम दर्जाचे एचटीएमएल (HTML) वेब टेम्पलेट तयार करुन ते नवीन वेबसाईट करणाऱ्यांना उपलब्ध करुन देतो. भाजपाची वेबसाईट मागील काही दिवसांपासून बंद होती. ती पुन्हा सुरु झाली. त्यातही त्यांनी आमचे टेम्पलेट वापरल्याने आम्हाला खूपच आनंद झाला. आमच्या वेबसाईटवरील टेम्पलेट कोणीही वापरू शकतो. मात्र ते वापरल्यानंतर वेबसाईटच्या शेवटी एक बॅक लिंक असते ज्यावरुन हे टेम्पलेट कोणी तयार केले आहे हे समजते. भाजपाने आपल्या साईटवरून ही बॅक लिंकच काढून टाकली आहे. त्यांनी बॅकलिंक काढून टाकत या कामाचे क्रेडिट आम्हाला दिले नाही. या टेम्पलेटसाठी भाजपाने आम्हाला पैसेही दिले नाहीत. आता भाजपाच्या आयटी सेलने वेबसाईटचे संपूर्ण कोडींग बदलले आहे, असे कंपनीने या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/W3layouts/status/1109207489453666305

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)