कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पावनखिंडीमध्ये दारू पीत बसलेल्या वीस ते पंचवीस मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश्या झोडपून काढत चोप दिलाय. करवीर तालुका परिसरातील ही मद्यपि पावनखिंडमध्ये गाडीमध्ये दारू पीत बसले होते. या गाडीमध्ये डॅशबोर्डवर शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचे चित्र होते. त्यामुळे संतप्त शिवभक्त कार्यकर्त्यांनी मद्यपींना चांगला चोप दिला.
शिवराष्ट्र संस्थेची 13 ते 15 जुलै दरम्यान पन्हाळगड पावनखिंड मोहीम होती. पावनखिंडमध्ये मोहिमेचा समारोप झाला. समारोप झाल्यानंतर कार्यकर्ते पांढरपाण्याची दिशेने जात असताना पावनखिंड पार्किंग परिसरात पाच ते सहा गाड्यांमध्ये करवीर तालुक्यातील वीस ते पंचवीस जण दारू पीत बसले होते. ही माहिती मिळताच शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाड्याची झडती घेतली. दारू पीत बसलेलेना बाहेर काढून चांगला चोप दिला. चोप देऊन त्यांची दारु उतरवली. यापुढे पावनखिंड तसेच किल्ल्यांवर दारू पिणार नसल्याची कबुली मध्यपीनी दिली. पावनखिंड परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.