कॉन्ट्रॅक्‍टर निवडताना…. (भाग-१)

कंत्राटदार हा बांधकाम क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा घटक. कंत्राटदार अनेक असतात. त्यामुळे घर बांधणाऱ्याचा गोंधळ उडू शकतो. अशा परिस्थितीत कुणी कुठला प्रकल्प साकारलाय याचा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. बऱ्याचशा व्यक्‍ती अशा वेळी बांधकामाचा अनुभव असलेल्या आपल्या मित्राचा वा नातेवाईकांचा सल्ला घेतात; परंतु कोडं सुटण्याऐवजी ते जास्त कठीण बनत जातं. कारण प्रत्येकानं केलेल्या सूचना घरकुल बांधणाऱ्याची स्थिती चक्रव्युहातील अभिमन्यूप्रमाणे करतात. काही जण नव्या कंत्राटदारांच्या हातात काम सोपविण्याची जोखीम पत्करतात. मग अनुभव नसलेल्या त्या माणसामुळे घरमालाकवर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. कंत्राटदाराकडे पात्र अभियंता सुद्धा असावा लागतो.

कंत्राटदाराची दोन गटात विभागणी करता येईल. “लेबर कॉन्ट्रॅक्‍टर’ आणि “मटेरियल-लेबर कॉन्ट्रॅक्‍टर’. मजुरांचा पुरवठा करणं हे पहिल्याच प्रमुख काम, तर दुसरा त्याच्या जोडीला सिमेंट, पोलाद वगैरे महत्त्वाच्या साहित्याची व्यवस्था करतो. “लेबर कॉन्ट्रॅक्‍टर’ला त्यानं आणलेल्या मजुरांच्या संख्येप्रमाणे पैसे मिळतात. “मटेरियल कॉन्ट्रॅक्‍टर’ टक्‍केवारीच्या साहाय्यानं शुल्क आकारतो.

कॉन्ट्रॅक्‍टर निवडताना…. (भाग-२)

कंत्राटादाराला घेऊन दोन प्रकारे बांधकामांना हात घालता येतो. पहिल्या प्रकारात कंत्राटदाराला मजूर आणि साहित्य वापरण्याची मोकळीक द्यायची, तर दुसऱ्यात आपण “कॉन्ट्रॅक्‍टर’चा वापर करायचा, दुसरा मार्ग चोखाळायचा असल्यास आपण स्वतः कुशल असणं अत्यंत आवश्‍यक. अन्यथा हात पोळून घेण्याची तयारी ठेवलेली बरी. कित्येकांना असं वाटेल की, कंत्राटदाराला टक्‍केवारीप्रमाणे पैसे देणं म्हणजे नुकसानचं. त्याच्या मतानुसार, बांधकाम साहित्य विकत घेण्याच्या बाबतीत फार मोठं कौशल्य कशाला हवं? वरवर विचार केल्यास हे बरोबर वाटेल, पण डोक्‍याला जरा त्रास दिल्यास चित्र बरचसं वेगळ दिसेल.

– आशिष जोशी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)