पुणेकरांमध्ये चांगल्या कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 3)

-डाॅ.निलेश शहा 

मोठ्या संख्येतील पुणेकरांना बॅड कोलेस्टेरॉलचा त्रास होत असून याचे मुख्य कारण चुकीची जीवनशैली, हे आहे.

ट्रायग्लिसेराइड्‌स व कोलेस्टेरॉल ही स्वतंत्र प्रकारची लिपिड असून, ती रक्तामध्ये वहन करत असतात. न वापरलेल्या कॅलरीज ट्रायग्लिसेराइड्‌समध्ये साठवल्या जातात व शरीराला ऊर्जा पुरवली जाते, तर कोलेस्टेरॉलचा वापर पेशी व विशिष्ट हार्मोन निर्माण करण्यासाठी केला जातो. ट्रायग्लिसेराइड्‌स व कोलेस्टेरॉल रक्तामध्ये विरघळू शकत नसल्याने ते लिपिडच्या वहनासाठी मदत करणाऱ्या प्रोटिन्सच्या (लिपोप्रोटिन्स) मदतीने शरीरभर फिरत असतात.

-Ads-

हाय ट्रायग्लिसेराइड्‌स ही अन्य एका वैद्यकीय समस्येची खूण असते, ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा व स्ट्रोकचा धोका वाढतो. यामध्ये ओबिसिटी व मेटॅबोलिक सिंड्रोम – कमरेभोवती अति प्रमाणात मेद, उच्च रक्तदाब, हाय ट्रायग्लिसेराइड्‌स, हाय ब्लड शुगर व असाधारण कोलेस्टेरॉल पातळी अशा विविध समस्यांचा समावेश असतो.

रक्तातील कोलेस्टेरॉल पातळीवर विविध घटक परिणाम करतात व त्यातून एलडीएल कोलेस्टेरॉलची उच्च पातळी निर्माण होते. व्यायामाचा अभाव व हालचाल नसणे यामुळेही रक्तातील एचडीएल कोलेस्टेरॉलच्या पातळीला चालना देण्यासाठी व एलडीएल कमी घातक ठरण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शरीरातील कोलेस्टेरॉल पातळीवर परिणाम होऊ शकतो, असे संशोधनात आढळले आहे. योग्य निदान करून घेणे व डॉक्‍टरांकडून वेळोवेळी तपासणी करून घेणे, यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी मदत होऊ शकते.

कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 1)  कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 2)

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)