पुणेकरांमध्ये चांगल्या कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 2)

-डाॅ.निलेश शहा

मोठ्या संख्येतील पुणेकरांना बॅड कोलेस्टेरॉलचा त्रास होत असून याचे मुख्य कारण चुकीची जीवनशैली, हे आहे.

तुमचे कोलेस्टेरॉल जाणून घ्या

कोलेस्टेरॉल हा पेशीच्या अस्तरामधील मेदासारखा घटक (लिपिड) असतो. बाइल ऍसिड्‌स व स्टेरॉइड हार्मोन्स यासाठी तो मुख्य द्रव्य असतो. साधारणतः कोलेस्टेरॉल लिपिड व प्रोटिन्स (लिपोप्रोटिन्स) यांना घेऊन विशिष्ट कणांमध्ये रक्तामध्ये वहन करत असते. आधुनिक काळात, हृदयाच्या आजारांचा अधिक धोका असण्याशी संबंधित असलेल्या ब्लड लिपिड पॅटर्नसाठी नॉन-एचडीएल कोलेस्टेरॉल (नॉन-एचडीएल-सी) या खुमेचा वापर सर्रास केला जातो.

हाय ब्लड कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसेराइड –

हाय कोलेस्टेरॉलच्या स्थितीत रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल असते; साधारणपणे याची कोणतीही लक्षणे किंवा चिन्हे दिसत नाहीत. हाय ब्लड कोलेस्टेरॉल असलेल्या व्यक्तींना कार्डिऍक धोका निर्माण होण्याची शक्‍यता अधिक असते. यामुळे धमन्यांमध्ये प्लाक निर्माण होऊ शकतात.

प्लाक हे नेहमी मेद व कोलेस्टेरॉलपासून बनलेले असतात व त्यामुळे धमन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात व हृदय व मेंदू यांना होणाऱ्या ऑक्‍सिजनच्या पुरवठ्यामध्ये कमतरता निर्माण होते त्यातून ऍथरोस्क्‍लेरॉसिसचा त्रास होतो; यामुळे हार्ट ऍटॅक किंवा स्ट्रोकची शक्‍यता वाढते. रक्तातील एचडीएलचे (गुड कोलेस्टेरॉल) प्रमाण अधिक असल्यास हृदयाचे विकार होण्याची शक्‍यता कमी होते.

लो-डेन्सिटी लिपोप्रोटिन (एलडीएल) किंवा बॅड कोलेस्टेरॉल आपल्या शरीरात सर्वत्र कोलेस्टेरॉल कणांचे वहन करते. एलडीएल कोलेस्टेरॉल धमन्यांमध्ये साचते व त्यामुळे धमन्या अरुंद होतात.

हाय-डेन्सिटी लिपोप्रोटिन यास अनेकदा गुड कोलेस्टेरॉलला म्हटले जाते. एचडीएल शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल शोषून घेते व ते यकृताकडे घेऊन जाते. तेथे कोलेस्टेरॉलचे विघटन केले जाते व शरीरातून बाहेर सोडून दिले जाते.

कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 1)  कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)