पुणेकरांमध्ये चांगल्या कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 1)

-डाॅ.निलेश शहा

मोठ्या संख्येतील पुणेकरांना बॅड कोलेस्टेरॉलचा त्रास होत असून याचे मुख्य कारण चुकीची जीवनशैली, हे आहे.

दहापैकी प्रत्येक तीन व्यक्तींमध्ये ट्रायग्लिसेराइडची पातळी उच्च असल्याचे नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले, तर तितक्‍याच व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलची बॉर्डरलाइन हाय व हाय लेव्हल आढळली.

-Ads-

लिपिड प्रोफाइल तपासण्यासाठी पुण्यातील 20 ते 80 वर्षे वयोगटातील 6,95,835 हून अधिक नमुने तपासण्यात आले. तपासलेल्या नमुन्यांपैकी केवळ 10% नमुन्यांमध्ये एचडीएल (गुड) कोलेस्टेरॉलचे प्रमाण आदर्श आढळले. एचडीएल पातळी कमी असणे निरोगीपणाचे लक्षण नाही आणि जीवनशैलीमध्ये आवश्‍यक बदल करून त्यावर उपचार व नियंत्रण करणे गरजेचे आहे.

भारतात कार्डिओव्हस्क्‍युलर आजारांचे प्रमाण अव्याहतपणे वाढते आहे. यासाठी जीवनशैलीतील बदल, व्यायामाचा अभाव, पोषण नसलेल्या आहाराचे सेवन, वाढलेला ताण, धूम्रपान, मद्य व तंबाखूचा अतिरिक्त वापर, हे घटक कारणीभूत आहेत.

याची ठोस लक्षणे दिसून येत नसल्याने, चांगले आरोग्य राखण्यासाठी कोलेस्टेरॉल पातळीची संपूर्ण तपासणी करून घेणे आवश्‍यक आहे. कामाचे वाढलेले तास, धकाधकीचा प्रवास व बैठ्या जीवनशैलीमुळे स्थूलतेचे वाढते प्रमाण यामुळेही लोकांना असलेला हृदयाच्या आजारांचा धोका वाढला आहे.

पुण्यामध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणातून पुढील निष्कर्ष आढळले .

दहापैकी तीन व्यक्तींमध्ये कोलेस्टेरॉलची बॉर्डरलाइन हाय व हाय लेव्हल आढळली.

पुण्यामध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये एचडीएल पातळी असाधारण प्रमाणात होती. एचडीएल कोलेस्टेरॉलला गुड कोलेस्टेरॉल म्हटले जाते व त्याची 40 mg/dl हून अधिक पातळी आवश्‍यक असते.

तपासलेल्या नमुन्यांपैकी केवळ 10% नमुन्यांमध्ये एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी आवश्‍यक तितकी होती .दहा पैकी तीन व्यक्तींमध्ये ट्रायग्लिसेराइडचे प्रमाण उच्च आढळले.

कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 2)  कोलेस्टेराॅलचे प्रमाण कमी (भाग 3)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)