चढाच्या माशांसाठी जीवाची बाजी

पाचगणी  – पाचगणी, भिलार परिसरात पडत असलेल्या धुव्वाधार पावसाने परिसरातील ओढे नाले खळाळून वाहत आहेत. महू धरणात येणाऱ्या पाण्याची आवक खूपच वाढली आहे. तर काही हौशी लोक आपल्या जीवावर उधार होत. मासे धरण्यासाठी पाण्याच्या प्रवाहात जाऊन जीव धोक्‍यात घालताना दिसत आहेत.

पावसाने डोंगर परिसरातील ओहळ, ओढे, नाले पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. या सर्व पाण्याचा प्रवाह वेगाने महू धरणात जमा होत आहे. या प्रवाहाच्या गढूळ पाण्याने धरणातील मासे हे उलट्या दिशेने आपला प्रवास सुरुवात करतात. हे माशे समुहाने प्रवाहाच्या कमी पाण्याच्या झोतातून पुढे सरकत असतात. हे मासे पकडण्यासाठी असंख्य तरुण आपला जीव धोक्‍यात घालून धरण क्षेत्रातील नदीच्या पत्रातील पाण्याच्या प्रवाहात धबधब्याच्या ठिकाणी पाण्यात उतरून माशांसाठी स्वतःचा जीव धोक्‍यात घालुन माशे पकडताना दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)