चीनचे अवकाश यान चंद्रावर उतरले

बिजींग; चीनचे चांद्रयान आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या रहस्यमय असलेल्या भागावर उतरणारे ते जगातील पहिले अंतराळ यान ठरले. चीनच्या अंतराळ मोहिमेला मिळालेले हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. तसेच कम्युनिस्ट राजवटीच्या काळातील हे सर्वात मोठे यशही ठरले आहे. चीनने 2004 पासून चांद्रमोहिमेला सुरुवात केली. तेंव्हापासूनचे “चॅंग-4′ हे चौथे अंतराळ यान आहे.

“चॅंग ए -4′ अंतराळ यान चंद्राच्या अतिदूर्गम भागावर उतरले आहे. तेथील पहिला फोटोही या यानाने पृथ्वीवर पाठवला आहे. हा फोटो चीनी अंतराळ संस्थेने प्रसिद्धही केला आहे. चंद्राच्या पूर्वेकडे 177.6 अंश रेखांश आणि 45.5 अंश दक्षिण अक्षांशावर स्थानिक प्रमाण वेळेनुसार सकाळी 10 वाजून 26 मिनिटांनी हे अंतराळ यान पृष्ठभागावर उतरले, असे “चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन’ने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्णतः रोबोकृत या अंतराळयानामध्ये चंद्राच्या पृष्ठभागाची तपासणी करणारी यंत्रसामुग्री बसवण्यात आली आहे. या अंतराळ यानाद्वारेच चंद्राच्या पृष्ठभागाची जैविक चाचणीही घेतली जाणार आहे. या यानावर नेदरलॅन्ड, जर्मनी, स्वीडन आणि सौदी अरेबियाने विकसित केलेली वैज्ञानिक उपकरणे आहेत.

यापूर्वी झालेल्या चांद्रमोहिमांमध्ये चंद्राच्या पृथ्वीकडे असणाऱ्या दर्शनी भागावर यान उतरवण्यात आले होते. मात्र चीनचे यान पृथ्वीवरून दिसू न शकणाऱ्या भागावर उतरले आहे, हे विशेष आहे. या भागावरून पृथ्वीवर थेट संपर्क साधला जाऊ शकणार नाही. त्यासाठी “क्‍वांकियो’नावाचा उपग्रह चीनने गेल्यावर्षी मे महिन्यात अंतराळात सोडला आहे. “चॅंग- 4′ आणि पृथ्वीमधील संदेशवहनात हा उपग्रह मध्यस्थ म्हणून कार्यरत असणार आहे. यापूर्वी 1959 मध्ये रशियाने चंद्राबाबतच्या संशोधनाला सर्वात प्रथम सुरुवात केली होती. आता चंद्राबाबतच्या संशोधनाला अधिक वेग येईल, असा संशोधकांचा अंदाज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)