चिनी मांजाने कापला गळा, दुचाकीस्वार गंभीर जखमी

लोणंद-  पुणे येथे हॉस्पिटलमधील आजारी पाहुण्यांना पाहण्यासाठी मुंजवडी, ता. फलटण येथील दत्तात्रय किसन आवळे (वय 44) व त्यांचा मुलगा विकी दत्तात्रय आवळे गेले होते. पाहुण्यांना भेटून येत असताना ते मोटरसायकलवरून लोणंद मार्गे फलटणच्या दिशेने मुंजवडी गावाकडे निघाले होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लोणंद पोलीस ठाण्याच्या थोडे पुढे गेल्यावर केतकी ढाब्याजवळच अचानक पतंगाच्या मांजाच्या धागा दत्तात्रय आवळे यांच्या गळ्याला घासला. यामुळे गळा कापला जावून ते गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना सिद्धीविनायक हॉस्पीटल येथे त्यांच्या मुलाने मोटरसायकलवरून आणले. डॉ. नितीन सावंत यांनी रुग्णावर तातडीने उपचार केले मांज्याचा धागा गळ्याला कापला गेल्याने गळ्याला आठ टाके पडले. वेळीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले.

राज्यात बंदी असूनही चीनी मांजा सर्रासपणे सर्व दुकानात उपलब्ध आहे. या मांजाने राज्यात अनेक बळी घेतले आहेत. तरीही प्रशासनाला याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्‍यकता वाटत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.
-राजेंद्र डोईफोडे, विरोधीपक्षनेते, लोणंद नगरपंचायत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्याच वर्षी चिनी मांज्याचा दोरा गळ्याला कापल्याने लोणंदच्या मुलाचा जीव गेलेला होता. लोणंदमधील जे दुकानदार चिनी मांज्याचा दोरा विकत असतील त्यांच्यावर लोणंद नगरपरिषदेने बंदी आणावी, तरच अशा घटणाऱ्या घटना थांबतील. – विशाल जाधव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)