चिनी मोटार कंपन्यांचा भारतात येण्याचा प्रयत्न 

शांघाय – आतापर्यंत चीनच्या कंपन्यांनी भारतात विविध क्षेत्रात प्रवेश केला होता. मात्र मोटार क्षेत्रात चीनमधील कंपन्या फारशा सक्रिय नव्हत्या. आता या क्षेत्रातही चीनच्या कंपन्या प्रवेश करू लागल्या असल्याचे वातावरण आहे.
एसएआयसी मोटर कॉर्पोरेशनच्या पूर्ण नियंत्रणातील कंपनी एमजी मोटर इंडिया आता भारतात विद्युतचलित एसयूवीची (स्पोर्टस यूटिलिटी व्हेइकल) निर्मिती 2020 च्या पहिल्या सहामाहीत सुरू करणार आहे.

कंपनी त्या अगोदर 2019 च्या दुसऱ्या तिमाहीत मध्यम आकाराची एसयूवी कार सादर करेल. एमजी मोटर दोन्ही उत्पादने गुजरातमधील हलोल कारखान्यात बनविणार आहे. कंपनीने हा कारखाना गेल्या वर्षी जनरल मोटर्सकडून खरेदी केला. जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकतेनुसार एमजी इलेक्‍ट्रिक एसयूवी बनविणार असून भारताच्या ऊर्जा आणि पर्यावरणात योगदान देणार आहे, असे एसएआयसी मोटर चे कार्यकारी निर्देशक (आंतरराष्ट्रीय व्यापार) मायकल यांग यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)