चिंचवड पोलिसांना ‘सुरक्षा’ भेट

तीन ‘बॉडी रायट गियर’ सुपूर्द : संकट समयी ठरणार उपयोगी

पिंपरी – वाढत्या शहरीकरणामुळे पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच आता पिंपरी चिंचवड शहराचे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयही नुकतेच सुरू झालेले आहे. सद्यस्थितीत शहराच्या विस्ताराबरोबर संघटित गुन्हेगारीही फोफावत आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये कित्येकदा वेगवेगळ्या कारणांवरुन तणावपूर्ण स्थिती निर्माण होताना दिसून आली ओ. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुद्धा तेवढीच मोलाची असणार आहे, ही बाब ध्यानात घेत पोलीस मित्र परिवार तसेंच मधुराज इंटरप्रायजेस च्या वतीने चिंचवड पोलीस ठाण्यास 3 “बॉडी रायट गियर’ हे सुरक्षा पोषाख भेट देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रसंगी चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे,सहा.पोलीस उपनिरीक्षक डी. जी.कांबळे, ज्येष्ठ पोलीस मित्र सुभाष मालुसरे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, कार्याध्यक्ष गोपाळ बिरारी, महिला अध्यक्ष अर्चना घाळी-दाभोळकर, बाबासाहेब घाळी उपस्थित होते.

या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले, उत्सव असो किंवा पालखी सोहळा पोलीस मित्र परिवाराचे सदस्य हे सामाजिक संस्था वा सुरक्षा समितीच्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला मोलाची साथ देत आले आहेत. अनेक वर्षांपासून हा मित्र परिवार, एसपीओ नागरिक तसेच पोलीस कर्मचारी यांच्या सुरक्षेकरिता दक्ष असतो. आज मिळालेल्या ह्या सुरक्षा पोषाखामुळे दंगलग्रस्त परिस्थितीत पोलीस कर्मचारी नक्कीच सुरक्षित असेल.

मधुराज इंटरप्रायजेस पुणे चे संचालक राजेंद्र वाघ म्हणाले, दंगलग्रस्त परिस्थितीमध्ये सदरच्या सुटचा उपयोग मोलाचा ठरतो. गतीने फेकून मारलेल्या वस्तूंपासून संपूर्ण शरीराचे रायट पोलीस गियर मुळे रक्षण होते.उच्चक्षमतेच्या अभियांत्रिकी प्लास्टिक पासून सदरच्या सुटची निर्मिती करण्यात आली आहे.त्यामुळे सदरचा ड्रेस हलका बनलेला आहे.
पोलिसांसाठी अत्यावश्‍यक

गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात संघटीत गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे पोलिसांची सुरक्षितता देखील महत्त्वाची झाली आहे. पोलिसांना भेट म्हणून देण्यात आलेल्या “बॉडी रायट गियर’ची उंची 175 सेंटीमीटर असून वेगाने फेकल्या जाणारे दगड, सोड्याच्या बाटल्या, पेट्रोल बॉम्ब व इतर वस्तूंपासून पोलिसांचे संरक्षण करेल. आजवर कित्येकदा दगडफेक व इतर घटनांमध्ये कित्येक पोलिसांनी आयुष्यभराची दुखापत सोसावी लागली आहे, तर काहींच्या डोळ्याजवळ इजा देखील झाली आहे. अशा सर्व प्रकारच्या इजांपासून हा सुरक्षा पोशाक पोलिसांचे संरक्षण करू शकेल.

“बॉडी रायट गियर’ एकीकडून दुसरीकडे नेण्यासाठी हलका व सोपा आहे. तसेच 20 ते 22 वर्षे याला काहीही होत नाही. याच्यावर कीटाणू जमा होत नाहीत किंवा हा गंजतही नाही. “बॉडी रायट गियर’हा खूप महाग असल्याने पोलिसांकडे उपलब्ध होत नाही परंतु पोलीस मित्र परिवार आणि मधुराज इंटरप्रायजेस पुणेच्या वतीने पोलिसांना देण्यात आलेली भेट ही शहरातील पहिलीच घटना आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)