आमच्या भूमिकेमुळे चीन नमले – ट्रम्प यांचे वक्तव्य

अमेरिका-चीन व्यापार युद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे

वॉशिंग्टन: आम्ही चीनी मालावर आधिक कर आकारणी करून चीनच्या भूमिकेला परिणामकारकपणे उत्तर दिल्याने त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आमच्या निर्णयाने विपरीत परिणाम झाला आहे त्यामुळे चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार विषयक व्यापक करार लवकरच होईल असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. चीनने अमेरिकेच्या व्यापार युद्धाच्या संबंधात नमती भूमिका घेत अमेरिकन वस्तुंवरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेचेही अमेरिकेने स्वागत केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ट्रम्प यांनी आपल्या ट्‌विटरवर या विषयी माहिती देताना म्हटले आहे की अमेरिकेशी असलेल्या व्यापार युद्धामुळे चीनची अर्थव्यवस्था अपेक्षे इतका वेग पकडू शकलेली नाही असे खुद्द चीननेच म्हटले आहे. त्यांनी अमेरिकन मालावर लावण्यात आलेला जादाचा कर मागे घेतला आहे. त्यांची ही भूमिका चांगली असून अमेरिकेचेही चांगलेच चालले आहे अशी टिपण्णी त्यांनी केली आहे. त्यांनी थेट शब्द वापरले नसले तरी अमेरिकेनेही चीनच्या मालावर अधिक कर लागू करून त्यांना मोठे प्रत्युत्तर दिल्यानेच चीनला माघार घ्यावी लागली आहे आणि अमेरिकेची ही भूमिकाच योग्य होती असे ट्रम्प यांना या प्रतिक्रीयेतून ध्वनित करायचे आहे असा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे.

गेली सुमारे तीन महिने अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरू आहे. त्यावर आता युद्धबंदीचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात जी 20 च्या परिषदेच्या निमीत्त नुकतीच एक बैठक झाली त्यात ही तडजोड करण्याच्या विषयाला चालना मिळाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)