मोदींच्या अरूणाचल भेटीला चीनचा विरोध; भारताने सुनावले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अरूणाचल प्रदेश भेटीला चीनने विरोध दर्शवला. त्यावरून अरूणाचल हा आमचा अविभाज्य भाग आहे, अशा शब्दांत भारताने त्या देशाला सुनावले.

भारताचे अरूणाचल हे राज्य चीनच्या सीमेलगत आहे. मात्र, अरूणाचलच्या भूभागावर चीनची वक्रदृष्टी आहे. अरूणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून केला जातो. यापार्श्‍वभूमीवर, मोदींच्या भेटीवरून चीनने आदळआपट केली. भारताने दोन्ही देशांचे समान हित ध्यानात घ्यावे. सीमा प्रश्‍नावरील वाद चिघळेल अशी कृती भारताने करू नये. आम्ही तथाकथित अरूणाचलला कधीच मान्यता दिलेली नाही, असे चीनने म्हटले. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडक प्रतिक्रिया दिली.

अरूणाचल हा आमचा अविभाज्य भाग असल्याने भारतीय नेते त्या राज्याला वारंवार भेटी देतात. आमची ही सातत्यपूर्ण भूमिका चीनला अनेकदा कळवण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. भारत आणि चीनमधील सीमा प्रश्‍न प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांत आतापर्यंत चर्चेच्या 21 फेऱ्या झाल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)