चीनचे नवीन रडार -भारताएवढ्या क्षेत्रफळावर नजर ठेवण्यास सक्षम

बीजिंग (चीन): चीनने एक नवीन रडार विकसित केले असून ते भारताएवढ्या क्षेत्रफळावर नजर ठेवण्यास सक्षम असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक पातळीवर आपला प्रभाव वाढवण्यासाठी चीन नवनवीन शस्त्रास्त्र्रे अणि तंत्रज्ञानाने आपले लष्कर मजबूत करत आहे. त्यातील हे रडार एक भाग आहे. ओटीएच (ओव्हर द होरायझन) नावाच्या या रडार कार्यक्रमाची माहिती चिनी मीडियाने दिली आहे.

संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या नवीन रडारप्रणालीमुळे चिनी नौदल सागरावर पूर्णपणे नजर ठेवू शकणार आहे, शत्रूच्या युद्धनौका, विमाने आणि क्षेपणास्त्रांमुळे होणाऱ्या धोक्‍याची जाणीव या रडारमुळे बरीच अगोदर होऊ शकणार आहे. ओटीएचच्या निर्मितीचे श्रेय चिनी विज्ञान अकादमीचे शास्त्रज्ञ लियू वेंगटन यांना देण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युद्धनौकांवर तैनात करण्यात येणाऱ्या ओटीएस रडारमुळे दक्षिण चीन सागर, हिंद महासागर आणि पॅसेफिक महासागरासारख्या सागरी क्षेत्रावरील माहिती मिळवण्याची चिनी नौदलाची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)