चीनचे उफाळून आले पाकिस्तान प्रेम 

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकला आवश्‍यक ती मदत करू 

बिजींग – आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला आवश्‍यक ती सर्व मदत आम्ही करू अशी ग्वाही चीनने त्यांना दिली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान सध्या याच मदतीच्या याचनेसाठी चीन भेटीवर आले असून त्यांना चीनने होकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही देशांदरम्यान या निमीत्ताने एकूण 16 करारही यावेळी करण्यात आले आहेत. चीनचे पंतप्रधान ली केकीयांग यांनी म्हटले आहे की चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही सर्वकालीक मैत्री असून ती कोणत्याही कारणाने दुरावली जाण्याची शक्‍यता नाही.

सर्वच क्षेत्रात आम्ही एकमेकांना सहकार्य करीत आहोत. आम्ही आमच्या परराष्ट्र धोरणात चीनला कायमच प्राधान्य देत आलो आहोत आणि यापुढेही देत राहु असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी चिनी पंतप्रधानांनी पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचीही ग्वाही दिली पण त्यांनी पाकला नेमकी किती मदत दिली जाईल याचा तपशील दिलेला नाही. तथापी पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानला सहा अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे मान्य केले आहे.

चीन-पाकिस्तान इकॉनॉनिमक कॉरिडॉर विषयावरही दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली. यातील काही प्रकल्पांना पाकिस्तानचा आक्षेप आहे त्याबाबतही यावेळी चर्चा झाली असून यातील आक्षेपांच्या मुद्‌द्‌यांचे लवकरच निराकरण केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)